देशी दारू विक्रीप्रकरणी खडकीत तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशी दारू विक्रीप्रकरणी
खडकीत तरुणावर गुन्हा
देशी दारू विक्रीप्रकरणी खडकीत तरुणावर गुन्हा

देशी दारू विक्रीप्रकरणी खडकीत तरुणावर गुन्हा

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ४ ः खडकी (ता. आंबेगाव) येथील पोल्ट्री फार्मजवळ पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारू विक्री करणाऱ्या तरुणावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून, त्या ठिकाणावरून १ हजार दोनशे साठ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी रवींद्र चंद्रकांत शेळके (वय २८ रा. खडकी, ता. आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. शेटे यांना खडकी गावच्या हद्दीत दारू विक्री होत असल्याची बातमी समजली होती. याबाबत त्यांनी दोन पंच व पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळी छापा मारला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे यांनी दिली आहे.