मूलभूत सुविधांमुळे वळती सुजलाम सुफलाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूलभूत सुविधांमुळे वळती सुजलाम सुफलाम
मूलभूत सुविधांमुळे वळती सुजलाम सुफलाम

मूलभूत सुविधांमुळे वळती सुजलाम सुफलाम

sakal_logo
By

निरगुडसर, ता. १० : गेल्या ३० वर्षांमध्ये वळतीसह या पूर्व पट्ट्यातील अनेक गावांमध्ये वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. शेतकरी वर्ग सुखावला, पुढील काळात देखील विकासकामांचा वेग असाच सुरू राहील, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

वळती (ता. आंबेगाव) येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर विविध विकास कामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन समारंभ पार पाडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वळसे पाटील हे बोलत होते. यावेळी रस्ते डांबरीकरण, काँक्रिटी करण, खडीकरण, ओपन व्यायामशाळा, शालेय वर्गखोली बांधकाम, गावातील बंदिस्त गटार या कामाचे उद्‌घाटन झाले. ग्रामस्थांच्या वतीने धोंडिभाऊ भोर यांनी गावातील भार्गवराम मंदिरावरील पर्यटन विकास केंद्र,गावामध्ये विद्युत उपकेंद्र, बँक , गावठाणसाठी उर्वरित काँक्रिटीकरण तसेच गावांतर्गत अनेक पानंद रस्त्यांचा विकास कामांची मागणी केली
यावेळी देवदत्त निकम, बाळासाहेब बेंडे, विष्णुकाका हिंगे, शिवाजीराव लोंढे, धोंडिभाऊ भोर, जयसिंग थोरात, दत्ता हगवणे, महादू भोर, गोपाळ गवारी, गणेश यादव, आनंद वाव्हळ, बाळासाहेब बोऱ्हाडे, मनोहर शेळके, संजय भोर, सुनील शिंदे उपस्थित होते.

देवदत्त निकम म्हणाले की वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे वळती गावामध्ये आणि परिसरामध्ये झालेली आहेत. धोंडिभाऊ भोर यांच्या माध्यमातून गावपातळीवर अनेक युवकांना प्रोत्साहित करून रोजगारासाठी, शेतीसाठी सहकार्य लाभले आहे.

अर्जुन भोर यांनी प्रास्ताविक तर विनायक लोंढे सूत्रसंचालन केले. प्रवीण अजाब यांनी आभार मानले

00392