आंबेगावचा कायापालट करणारा शिल्पकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावचा कायापालट करणारा शिल्पकार
आंबेगावचा कायापालट करणारा शिल्पकार

आंबेगावचा कायापालट करणारा शिल्पकार

sakal_logo
By

आंबेगावचा कायापालट करणारा शिल्पकार
..............................................................................
आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा, विकासाचा शिल्पकार दिलीप वळसेपाटील यांच्या सारखा नेता मिळणे हे आंबेगावकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. केवळ सत्ता व खुर्चीसाठी काही तरी करायचे असा दृष्टिकोन न बाळगता त्यांनी समाजकारणच केले. आताही सत्ता व खुर्ची नाही तरी सुद्धा विकासकामे करण्यामध्ये ते मागे राहिले नाहीत. तालुक्याचा कायापालट करणारे माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील हेच जनतेचे खऱ्या अर्थाने नायक आहेत. देदीप्यमान कारकिर्दीतून सतत यशस्वी वाटचाल करणाऱ्या वळसेपाटलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
- नवनाथ भेके, निरगुडसर
..............................................................................


शेतकरी खऱ्या अर्थाने सदन बनला
वळसेसाहेबांनी खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्याचा कायापालट केला असून ते आपल्या तालुक्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहे. त्याचेच फळ आता आंबेगावला मिळाले आहे. यामध्ये सर्व प्रथम शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या डिंभे धरणाचे काम करून जिरायती क्षेत्र बागायती करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न यशस्वी ठरला. त्यामुळे आज आपला आंबेगाव तालुका सुजलाम्-सुफलाम् पाहायला मिळत आहे. बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस, कांदा, टोमॅटो, फ्लॅावर, कोबी, मिरची, बीट, मेथी ही नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. जनावरांना हिरवा चाराही उपलब्ध झाला. शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु केला. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळून शेतकरी खऱ्या अर्थाने सदन बनला आहे. याचे सर्व श्रेय वळसेपाटलांकडे जाते.


पीए ते गृहमंत्री प्रवास थक्क करणारा
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर सारख्या खेडेगावात दिलीपराव वळसेपाटील यांचा जन्म झाला. सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर अकरावीपर्यंत शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर येथे झाले. शालेय शिक्षण घेत असताना वडील स्वर्गीय दत्तात्रेय गोविंदराव वळसेपाटील हे १९६७ ते ७२ या कालावधीत आमदार होते. त्यामुळे ते नेहमी कामानिमित्त बाहेर असायचे. यावेळी दिलीपराव वळसेपाटील घरातील आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागत होते. अशा राजकीय व सामाजिक वातावरणात वाढल्‍यामुळे साहेबांना ते सर्व काही शिकायला मिळाले. खरे तर दादांची इच्छा होती की दिलीपरावांनी नोकरी करावी परंतु साहेबांना आपल्याच वडिलांच्या मतदारसंघात काम करून जनतेची सेवा करायची होती. अशामध्ये सन १९८१ ते ८८ दरम्यान पवार साहेबांचे स्वीय सचिव म्हणून काम करण्याची संधी लाभली. अशाप्रकारे पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेल्या वळसेपाटील हे १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. खरे पीए ते राज्याचा गृहमंत्री हा ४० वर्षाचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.

महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाची स्थापना
आमदारकीची पहिली टर्म पूर्ण झाल्यानंतर विकासकामांच्या जोरावर त्यांनी १९९५ ते २०१९ सलग विजय संपादन केला.जनतेच्या प्रेमापोटी मिळालेले हे सर्व विजय वळसेपाटलांनी निरर्थक जाऊ दिले नाही. देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारसाहेबांचा खंबीर पाठिंबा असलेल्या वळसेपाटलांना २००४ ते २००९ या कालावधीत उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण, ऊर्जा, अर्थ व नियोजनमंत्री पदाची सूत्रे मिळाली. वळसेपाटील हे १९९९ साली पहिल्यांदा मंत्री झाले. त्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. त्यावेळी पवारसाहेबांनी दिलेल्या प्रत्येक जबाबदारी साहेबांनी समर्थपणे पेलली. मंत्री झाल्यानंतर राज्यातील नागरिक संगणक साक्षर झाले पाहिजेत त्यानुसार महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाची (mkcl) स्थापना करून ५००० सेंटरची उभारणी केली. यातून २० हजार तरुणांच्या हाताला काम मिळाले तसेच लाखो जण संगणक साक्षर बनले.

राज्यात विजेच्या ५५५ सबस्टेशनची उभारणी
महत्त्वाच्या खात्यांचा कारभार अंत्यत कार्यक्षमतेने व समर्थपणे सांभाळून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्याचे मौलिक कार्य वळसेपाटील यांनी केले आहे. त्यामध्ये अडचणीच्या काळात असलेले ऊर्जामंत्री पद मिळाले. त्यावेळी साहेबांनी न डगमगता राज्यात विजेच्या ५५५ सबस्टेशनची उभारणी करून ५००० मेगावॅट वीजनिर्मितीचे नियोजन करून हे पद यशस्वी सांभाळले. साहेबांनी हे प्रसिद्धीसाठी कधीच केले नाही. त्याचे श्रेय पण घेतले नाही. ही महत्त्वाची खाती सांभाळत असताना पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आंबेगाव तालुक्यासह शिरू तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कामे करून खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणली. वळसेपाटील साहेबांना महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्येही वर्णी लागून पहिल्यांदा उत्पादनशुल्क व कामगारमंत्री त्यानंतर गृहमंत्रीपदावरही वर्णी लागून तेही यशस्वीपणे सांभाळले.

विकासकामांचा डोंगर उभारला
विकासकामांचा डोंगर उभारला-वळसेपाटलांनी राजकारणापेक्षा समाजकारण करण्यास अधिक प्राधान्य दिले. केवळ सत्ता व खुर्चीसाठी काही तरी करायचे असा दृष्टिकोन न बाळगता समाजासाठी त्यांनी समाजकारणच अधिक प्रमाणात केले. आमदारकीची पहिली टर्म पूर्ण झाल्यानंतर विकासकामांच्या जोरावर त्यांनी सलग विजय संपादन केला. जनतेच्या प्रेमापोटी मिळालेले हे सर्व विजय वळसेपाटलांनी निरर्थक जाऊ दिले नाही. वीज, रस्ते पाणी याचबरोबर आरोग्य केंद्रे,भीमाशंकर साखर कारखाना, बँक, पतसंस्था, पाझरतलाव, नळ पाणीपुरवठा योजना, वीजकेंद्रे, जलसिंचन योजना क्रीडासंकुल, संगणक साक्षरता, दुग्ध उत्पादन, बंधारे, पूल, डीएड, बीएड कॅालेज, शाळा महाविद्यालये, आदिवासी आश्रमशाळा, अस्मिता भवन, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय, मंचर उपजिल्हा रुग्णालय आदी विकासकामांचा डोंगर उभारला आहे. तसेच आंबेगाव व शिरूर तालुक्यातील अनेक मंदिरांना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देऊन विकासकामे करण्यात मोलाचा वाटा आहे. तसेच कोरोनाच्या काळात जनतेसाठी आरोग्य विषयक उभारलेल्या यंत्रणामुळे अनेक नागरिकांचे जीव वाचले हे साहेबांनी केलेले काम कायम स्मरणात राहणारे आहे.


दिलीप वळसेपाटील यांच्या नेतृत्वाबाबत बोलायचे झाले तर लोकविलक्षण नेतृत्व असा शब्द वापरावा लागेल. जनतेच्या विकासाचा मनाशी ध्यास बाळगणाऱ्या अशा नेत्याला नीरामय आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडून यापुढेही अशी जनहिताची उज्ज्वल कामगिरी होत राहो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा......

00456, 00457