निरगुडसरला शनिवारी जागतिक हात धुवा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरगुडसरला शनिवारी 
जागतिक हात धुवा दिन
निरगुडसरला शनिवारी जागतिक हात धुवा दिन

निरगुडसरला शनिवारी जागतिक हात धुवा दिन

sakal_logo
By

निरगुडसर, ता. १२ : जागतिक हात धुवा दिन १५ आक्टोबरला साजरा केला जातो. वैयक्तिक स्वच्छतेतील स्वच्छ हात धुणे हे ग्रामस्थांना शाळा व अंगणवाडी मधील विदयार्थ्यांना माहीती करुन देणे अत्यंत गरजेचे आहे. अस्वच्छ हातामुळे अनेक छोटया मोठया रोगांची निर्मिती होते याकरीता सतत हात धुणे व स्वच्छ ठेवणे हे लहानांबरोबर मोठ्या व्यक्तींना सांगणे गरजेचे आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शनिवारी (ता. १५) जागतिक हात धुवा दिनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या दिनानिमित्त हात धुवाचे महत्व सांगून त्याचे सवयीत रुपातंर करण्याकरीता जागतिक हात धुवा दिन आपल्या सर्व ग्रामपंचायत, सर्व अंगणवाडी तसेच सर्व शाळेत प्रात्यक्षिकेसह साजरा करावा असे आवाहन केले आहे.