श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप
श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप

श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप

sakal_logo
By

निरगुडसर : जाधववाडी (ता.आंबेगाव) येथील श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्थेतर्फे ७५ गवळ्यांना प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे प्रमाणे ११ लाख रुपये बोनस वाटप व सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष धोंडिभाऊ गंगाराम कुमकर यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील अग्रगण्य अशी नावाजलेली संस्था म्हणून जाधववाडी येथील श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्थेची ओळख आहे, संस्थेची स्थापना १९९२ साली झाली असून संस्थेमध्ये ७५ गवळी दररोज १३०० लिटर दूध संकलन करत आहेत. संस्थेच्या वतीने सन २०२१ - २२ या कालावधीत एकूण ४ लाख ८८ हजार ७२६ लिटर दूध संकलित करण्यात आले असून तब्बल ११ लाख रुपये बोनस वाटप केले आहे. प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे असा उच्चांकी बोनस संपूर्ण एका टप्प्यातच तसेच सभासदांना १५ टक्के लाभांश सुद्धा देण्यात आला आहे. संस्थेमार्फत सर्व गवळ्यांना दीपावलीनिमित्त मिठाई वाटप, त्याचबरोबर थंडीपासून बचाव होण्यासाठी उबदार ब्लॅंकेट सुद्धा वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव योगेश संभू जाधव यांनी दिली.

00433