भराडी येथे एकाचा नदीत बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भराडी येथे एकाचा
नदीत बुडून मृत्यू
भराडी येथे एकाचा नदीत बुडून मृत्यू

भराडी येथे एकाचा नदीत बुडून मृत्यू

sakal_logo
By

निरगुडसर, ता. १७ : भराडी (ता. आंबेगाव) येथे घोड नदी पात्रात बुडून सत्यवान (बाळू) धोंडिभाऊ पारधी (वय ४२, रा. भराडी; मूळ रा. येणवे, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. १६) हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मीराबाई विठ्ठल खंडे (वय ४०, रा. भराडी) यांनी पारगाव पोलिस ठाण्यात खबर दिली.
पारधी याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याने तो गेल्या काही वर्षापासून भराडी येथे एकटाच राहत होता व परिसरात मिळेल ते काम करून उपजीविका करत होता. तो दारू पिऊन नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला असताना त्याचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जढर हे तपास करत आहेत.