आंबेगाव तालुका एकल शिक्षक सेवा मंच अध्यक्षपदी गवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुका एकल शिक्षक सेवा मंच अध्यक्षपदी गवारी
आंबेगाव तालुका एकल शिक्षक सेवा मंच अध्यक्षपदी गवारी

आंबेगाव तालुका एकल शिक्षक सेवा मंच अध्यक्षपदी गवारी

sakal_logo
By

निरगुडसर, ता. २१ : आंबेगाव तालुका एकल शिक्षक सेवा मंचाच्या अध्यक्षपदी संतोष गवारी तर सरचिटणीसपदी विनायक राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
रविवारी (ता. २०) रोजी आंबेगाव तालुका एकल शिक्षक सेवा मंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जीवन मंगल कार्यालय मंचर येथे झाली. या वेळी थोरांदळे येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संतोष गवारी यांची अध्यक्षपदी तर उपक्रमशील शिक्षक विनायक राऊत यांची सरचिटणीस पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संघटनेच्या कार्याध्यक्षपदी युवराज आवटे, कोषाध्यक्षपदी राहुल शिंदे, नेते पदी तुषार शिंदे, सागर हगवणे, प्रवक्तेपदी विजय चिखले यांची निवड करण्यात आली. या वेळी विलास डोळस, ठकसेन गवारी, संजय घोटकर, सखाराम वाजे, विकास कानडे, विजय डोके, शंकर रोकडे, दत्तात्रेय अहिरे, गणेश गावडे, संतोष कानडे व एकल शिक्षक सेवा मंचाचे सभासद उपस्थित होते.

आयकार्ड संतोष गवारी विनायक राऊत