नरसिंह दूध संस्थेवर परिवर्तन पॅनेलची सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरसिंह दूध संस्थेवर
परिवर्तन पॅनेलची सत्ता
नरसिंह दूध संस्थेवर परिवर्तन पॅनेलची सत्ता

नरसिंह दूध संस्थेवर परिवर्तन पॅनेलची सत्ता

sakal_logo
By

निरगुडसर, ता. १३ : रांजणी (ता. आंबेगाव) येथील नरसिंह सहकारी दूध संस्थेच्या निवडणुकीत नरसिंह शेतकरी परिवर्तन पॅनेलने नरसिंह भैरवनाथ सहकार पॅनेलवर मात करत एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुधीर खंबायत यांनी दिली.
नरसिंह दूध संस्थेच्या सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नरसिंह भैरवनाथ सहकार पॅनेल व नरसिंह शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. त्यामध्ये नरसिंह शेतकरी परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. नरसिंह शेतकरी परिवर्तनचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. नरसिंह सहकारी दूध संस्थेच्या एकूण ९ जागा असून, त्यापैकी तीन जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे सहा जागांसाठी निवडणूक लागली होती. नरसिंह शेतकरी परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. नरसिंह शेतकरी परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार : चंद्रकांत गायकवाड, श्रीराम भोर, तात्याबा तळेकर, रामदास वाघ, अनिल भोर, शशिकांत वाघ. नरसिंह शेतकरी परिवर्तन पॅनेलचे शशिकला रोहिदास बढेकर व रत्नाकर शंकर सोनवणे हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.