
वळती येथून दुचाकीची चोरी
निरगुडसर, ता. ३ ः वळती (ता. आंबेगाव) येथील अमोल तुकाराम भोर यांच्या दुचाकीची मंगळवार (ता. २८) रोजी रात्री चोरी झाली. अज्ञात इसमाने घराबाहेरील तारेच्या कंपाउंडचा दरवाजा उचकटून होंडा कंपनीची (MH -१४ GP -६२४७) दुचाकी चोरून नेली.
आंबेगाव तालुक्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गेल्या काही दिवसात तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, वळती, गांजववाडी, थोरांदळे, शिंगवे आदी परिसरात नागरिकांच्या अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक घरातच झोपत असल्यामुळे चोरट्यांना चोरी करण्यास वाव मिळतो. मंगळवारी रात्री वळती येथील अमोल तुकाराम भोर यांच्या बंदीस्त अंगणात असलेली दुचाकी चोरट्यांनी कुंपणाचा दरवाजा तोडून चोरून नेली. परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय असून पोलिसांनी या चोरांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धोंडिभाऊ भोर यांनी केली.