Wed, June 7, 2023

आंबेगावच्या पूर्व भागात शिवजयंती साजरी
आंबेगावच्या पूर्व भागात शिवजयंती साजरी
Published on : 11 March 2023, 11:26 am
निरगुडसर, ता.११ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिंगवे येथील तरुण शिवभक्तांनी सकाळी शिवनेरीवरून शिवज्योत गावात आणून शिवज्योतीचे पूजन करण्यात आले.
वळती येथे गावातील शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोर यांनी दिली. वळती येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी गावातील तरुण वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित दिली. यावेळी सरपंच आनंद वाव्हळ, बाजीराव अजाब, बाबाजी भोर, अर्जुन भोर, अर्जुन अजाब, बारकु बेनके, प्रकाश लोंढे उपस्थित होते .
00741