गांजा तस्करीतील आरोपी
पारगाव पोलिसांकडून जेरबंद

गांजा तस्करीतील आरोपी पारगाव पोलिसांकडून जेरबंद

निरगुडसर, ता. १७ : गांजा तस्कर प्रकरणी १७ वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीस रायगड पोलिसांनी पारगाव पोलिसांच्या मदतीने अटक केली.
गांजा तस्करी प्रकरणी १७ वर्षा पासून फरारी असलेल्या आरोपी गणेश उत्तम चव्हाण (वय ४५, मूळ रा. जांभोरा, औरंगाबाद) हा आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे पोलिस ठाण्याच्या हद्दीत भराडी येथे राहत असल्याची माहिती रायगड पोलिसांनी पारगाव पोलिसांना कळवली होती. त्यानंतर पारगाव पोलिस व रायगड पोलिस यांनी गुरुवारी (ता. १६) आरोपी राहत असलेल्या ठिकाणी त्यास अटक करण्यास गेले असता आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना पोलिसांनी २०० मीटर पळून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपी हा घर बांधकाम करण्याचे काम करत असून, तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. पारगाव कारखाना पोलिस स्टेशन हद्दीत तीन ते चार दिवसांपूर्वी घर बांधकाम करण्यासाठी तो आला होता. त्यास रायगड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. रायगड येथील कर्जत विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी लागरे यांनी पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com