Sun, June 11, 2023

रांजणी येथील शेतात
बिबट्याचे तीन बछडे
रांजणी येथील शेतात बिबट्याचे तीन बछडे
Published on : 18 March 2023, 2:26 am
निरगुडसर, ता. १८ : रांजणी (ता. आंबेगाव) येथील धुमाळवस्ती येथे भरत हारकू वाघ यांच्या शेतात शनिवार (ता. १८) बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यापैकी दोन बछडे मृत आहेत.
वाघ यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. शनिवारी सकाळीच ऊसतोड कामगार शेतात दाखल झाले. ऊसतोडणीचे काम सुरु झाल्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास तीन बछडे ऊसतोडणी कामगारांना दिसले. त्यामुळे एकच घबराट उडाली. तीनपैकी दोन बछडे मृत असल्याचे दिसले; तर एक बछडा जिवंत आहे. स्थानिक शेतकरी रमेश सरदार भोर व नीलेश कानसकर यांनी घटनेची खबर वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन जिवंत बछड्यास ताब्यात घेतले.