नरसिंह विद्यालयातील ४४ जणांना शिष्यवृत्ती

नरसिंह विद्यालयातील ४४ जणांना शिष्यवृत्ती

निरगुडसर, ता.७ : रांजणी (ता.आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयातील ४४ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. टी. तोडकर यांनी दिली .
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये झालेल्या एनएमएमएस परीक्षेमध्ये नरसिंह विद्यालय रांजणीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यावर्षी विद्यालयातून ८० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी ४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. त्यांना पुढील पाच वर्ष १२००० रुपये प्रतिवर्षी याप्रमाणे ६०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे तर ४० विद्यार्थी छत्रपती शाहू महाराज संस्थान सारथी या शिष्यवृत्ती पात्र ठरलेले आहेत. त्यांना पुढील पाच वर्ष ९६०० रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील विषय शिक्षक एन. के. भालेराव, सी. एम. खुडे, आर. पी. तायडे, व्ही. जी. भोर, एम. एस. क्षीरसागर, एस. बी. थोरात, बी. डी. थोरात, एस. झेड. गोरडे, व्ही. डी. वाढे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. टी. तोडकर, पर्यवेक्षक आर. पी. पडवळ, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर हांडे, एकनाथ भोर, बंडेश वाघ, सरपंच छाया वाघ, रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी के. डी. रत्नपारखी व एस. टी. पवार यांनी अभिनंदन केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे : भोर ईश्वर संपत, भोर प्रांजल संतोष, केदार आकाश प्रकाश, कोकतरे पल्लवी भाऊसाहेब.

00833

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com