रांजणीत बछड्यांसह 
बिबट मादीचे दर्शन

रांजणीत बछड्यांसह बिबट मादीचे दर्शन

निरगुडसर, ता. ११ : रांजणी (ता. आंबेगाव) येथील चिमटावस्ती परिसरात बुधवारी (ता. १०) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन बछड्यांसह बिबट मादीचे शेतकऱ्यांना दर्शन झाले. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
रांजणी गावातील कारफाट्यानजीक चिमटावस्ती असून, येथे गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. बुधवारी (ता. १०) सकाळी शेतकरी जालिंदर रामभाऊ जाधव हे त्यांच्या पत्नी हिराबाई व इतर महिला शेतात भुईमूग खुरपणीसाठी निघाल्या असता त्यांना कडवळाच्या शेतात दोन बछडे दिसले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला, तर त्या बछड्यांच्या पुढे पन्नास फुटांच्या अंतरावर बिबट मादीदेखील दिसून आली. यावेळी मंचरकडे ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांनीदेखील बछड्यांना व मादीला पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com