वळती बंधाऱ्याच्या
२७ ढाप्यांची चोरी

वळती बंधाऱ्याच्या २७ ढाप्यांची चोरी

निरगुडसर, ता. १३ : वळती (ता. आंबेगाव) येथील वळती ते नागापूर गावांदरम्यान मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे २७ ढापे चोरीला गेल्याची घटना शनिवारी (ता. १३) उघडकीस आली. बंधाऱ्यावरील एकूण २७ ढापे चोरीला गेलेले असून, एका ढाप्याची किंमत साधारणपणे ८ हजार रुपये असून, पाटबंधारे विभागाचे २ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मीना नदीला पाणी सोडले असल्याने शनिवारी सकाळी पाटबंधारे विभागाचे एकनाथ खरमाळे हे बंधाऱ्यातील पाणीसाठा पाहण्यासाठी गेले असता बंधाऱ्यावरील बसविलेले नागापूर गावाच्या बाजूकडील सात गाळ्यांमधील ढापे काढून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तालुक्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसांपूर्वी नदीवरील वीजपंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, या बंधाऱ्यावरील ढापेसुद्धा चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात बंधाऱ्यावरील ढापे चोरीला गेल्याने बंधाऱ्यात पाणीसाठा राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होणार आहे. तरी पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर नवीन ढापे बसवावे, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते धोंडिभाऊ भोर, सरपंच आनंद वाव्हळ, गणपत लोंढे, पाटबंधारे विभागाचे एकनाथ खरमाळे, किसन गांजवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com