शिंगवे येथे पोल्ट्रीतील साहित्यांची चोरी

शिंगवे येथे पोल्ट्रीतील साहित्यांची चोरी

निरगुडसर, ता. १५ : शिंगवे (ता. आंबेगाव) येथील साकोरेमळ्यात कोंबड्यांच्या पोल्ट्रीच्या तारा वाकून जवळपास ४० हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविले.
याबाबत पारगाव पोलिस ठाण्यात पोल्ट्री व्यावसायिक नितीन दामोदर वाव्हळ यांनी फिर्याद दिली. वळती ते शिंगवे रस्त्यावर साकोरेमळ्याजवळ कोंबड्यांची पोल्ट्री आहे. सध्या पोल्ट्रीत पक्षी नसून, साहित्य ठेवले आहे. नितीन वाव्हळ हे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. ते शनिवारी (ता. १३) सकाळी मुंबईहून आल्यानंतर त्यांनी पोल्ट्रीचे दार उघडून पाहिले; तर पोल्ट्रीच्या एका बाजूच्या जाळीच्या तारा कट करून वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. पोल्ट्रीतील स्टॅन्डचे मोठ्या आकाराचे तीन पंखे, १० ताडपत्र्या, वीजेचे १० बल्ब व इतर किरकोळ साहित्य, असे जवळपास ४० हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले. पारगाव पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार आर. आर. इचके यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com