खडकी अंगणवाडीतून
विविध साहित्यांची चोरी

खडकी अंगणवाडीतून विविध साहित्यांची चोरी

निरगुडसर, ता. २० : खडकी-पांढरीवस्ती (ता. आंबेगाव) येथील अंगणवाडीमधून २८ हजार ४७० रुपयांच्या वस्तूंची चोरी झाली.
याबाबतची फिर्याद अंगणवाडी सेविका कमल शांताराम पोखरकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार त्या गुरुवारी (ता. १८) सकाळी पावणेआठ वाजता अंगणवाडी उघडण्यास गेले असता दरवाजा उघडा दिसला व कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांनी आतमध्ये डोकावून पाहिले असता मुलांची खेळणी अस्ताव्यस्त पडलेली दिसली. त्यावेळी त्यांनी सरपंच नारायण बांगर, पोलिस पाटील मंगल पोखरकर, दत्तात्रेय बांगर, सुनील भोर, दीपक बांगर यांना फोन करून माहिती दिली. या सर्वांनी आत जाऊन पाहिले असता चोरट्याने अंगणवाडीचा पुढील दरवाजाची कडी कोयंडा उचकटून आतील इलेक्ट्रीक शेगडी, एलईडी टीव्ही, एलईडी, ३० किलो तांदूळ, ८ किलो साखर, हरभरा २५ किलो, गोडेतेल १२ लिटर, मूगडाळ १० किलो, असा एकूण २८ हजार ४७० रुपयांची साहित्य चोरून नेल्याचे दिसले. पुढील तपास पोलिस हवालदार मांडवे करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com