
शिंगवे येथे पोल बसविण्याच्या कामास प्रारंभ
निरगुडसर, ता.२४ : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील कृषीपंप वीजजोडासाठी सुमारे १६ ते १७ पोलची आवश्यकता होती आणि दोन वर्षांपासून ''पोल देता का पोल?'' म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. परंतु ही समस्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापुढे मंगळवारी (ता.२३) शेतकरी, ग्रामस्थांनी मांडली. त्यामुळे त्वरित पोल बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यामुळे ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिंगवे येथील वाव्हळमळा, गोरडेमळा, माळीमळा, टाकेमळा येथील ग्रामस्थ शेतकरी यांनी वळसे पाटील यांची भेटल्यामुळे दोन वर्षापासून रखडलेले काम सुरू झाले. यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व स्वीय सहायक रामदास वळसे पाटील यांनी तातडीने वीज कंपनी अधिकारी यांच्याशी चर्चा केली व दुसऱ्या दिवशीच काम सुरू केले. कामाचा प्रारंभ बुधवारी (ता.२४) करण्यात आला.
यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, शरद बँकेचे माजी संचालक सुदाम वाव्हळ, उपसरपंच संतोष वाव्हळ, संदीप वाव्हळ, हिरामण गोरडे, किरण टाके, दत्ता कासार, महेश झोडगे, ज्ञानेश्वर पाबळे, गणेश टाव्हरे संदीप वाव्हळ, गजाभाऊ गाढवे पोपट गोरडे, दीपक जगताप उपस्थित होते.
00860