
बावडा परिसरात सामुहिक प्रार्थना
नीरा नरसिंहपूर, ता. ५ ः रमजान ईदनिमित्त बावडा परिसरातील गावांत सामुहिक नमाज पठण, प्रार्थना करून एकमेकांना आलिंगन देवून शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच शुरखुर्मा व गुलगूलेचा वाटप करण्यात आले. कोरोनामुक्ती होऊन सर्वांना सुख समाधानाने ठेवावे, अशा प्रकारची सामुहिक प्रार्थना करण्यात आली.
बावडा येथील ईदगाह मैदानावर मौलाना मुख्तार शेख यांनी नमाज पठण व प्रार्थना घेतली. मौलाना मंजूरभाई यांनी रमजान ईद बाबतचे महत्त्व पटवून दिले. पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांनी नमाज पठण व प्रार्थना घेतली. लुमेवाडी येथील ईदगाह मैदानात हाफीज जाबीर यांच्या उपस्थितीत नमाज पठण झाले. नीरा नरसिंहपूर परिसरातील गावात झालेल्या नमाज पठणानंतर कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना करण्यात आली. बावडा येथील ईदगाह मैदानावर बंदोबस्त ठेवणारे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. रफीक तांबोळी, रज्जाक शेख यांचाही सत्कार करण्यात आला.
Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01197 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..