गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी खटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी खटके
गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी खटके

गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी खटके

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ११ : गोंदी-ओझरे (ता. इंदापूर) ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कामिनी विठ्ठल खटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सविता अंगद देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच इंदुमती रामहरी वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर निवडणुकीचे काम ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी पाहिले. या निवडणुकीसाठी कामिनी खटके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडी प्रसंगी सरपंच प्रतिनिधी रणजित वाघमोडे, माजी उपसरपंच अंगद देशमुख, विलास जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप हजारे, मच्छिंद्र खटके, किरण वाघमोडे, शंकर खटके, युवराज डांगे, दीपक बनसोडे, हनुमंत सुळ, आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01208 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top