लुमेवाडीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ४० शेळ्या मृत्यूमुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुमेवाडीत मोकाट कुत्र्यांच्या 
हल्ल्यात ४० शेळ्या मृत्यूमुखी
लुमेवाडीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ४० शेळ्या मृत्यूमुखी

लुमेवाडीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ४० शेळ्या मृत्यूमुखी

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. २४ ः नीरा नदीकाठावरील लुमेवाडी, लिंबोडी, गोंदी गावांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये ४० ते ५० शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून ७ ते १० नागरिक जखमी झाले आहेत. सध्याला परिसरात कुत्र्यांच्या समूहाने दहशत माजवली आहे. ज्यामुळे शेतकरी शेतात एकटे न जाता समूहाने हातात काठ्या घेऊन जाताना दिसत आहेत.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या समूहाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या समूहात सुमारे १२ ते १५ कुत्री आहेत. त्यांनी शेळ्यांना लक्ष्य केले आहे. कुत्री शेळ्या मारून फस्त करीत असल्याने शेतात शेळ्यांना चरायला घेऊन जाण्याचे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. तसेच कुत्र्यांचा समूह माणसांवर हल्ले करत आहे. कुत्र्यांच्या समूहाच्या हल्ल्यात जखमी झालेले नागरिक अकलूज (ता. माळशिरस) येथील सरकारी दवाखान्यात औषधोपचार घेत आहेत. लुमेवाडी येथे कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे घाबरून पडल्याने दोन नागरिकांची हाडे मोडून गंभीर जखम झाली आहे. बेवारस कुत्र्यांना खाण्यासाठी अन्न मिळत नसल्याने शेळ्या व माणसांवर हल्ला करीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळ्या मृत्युमुखी पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून बाधित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी लुमेवाडी, लिंबोडी परीसरातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात नागरिकांनी पोलिस व पंचायत समितीकडे तक्रारी केल्या आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01229 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top