सराटी येथे घरोघरी पाण्याचे सर्व्‍हेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराटी येथे घरोघरी पाण्याचे सर्व्‍हेक्षण
सराटी येथे घरोघरी पाण्याचे सर्व्‍हेक्षण

सराटी येथे घरोघरी पाण्याचे सर्व्‍हेक्षण

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. २ ः पावसाळा व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सराटी (ता. इंदापूर) येथे आशासेविकांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देण्यात आल्या. त्यांनी पाणी पाहणी सर्व्हेक्षण करून दूषित पाणी साठवणूक टाक्या रिकाम्या करून घेतल्या.
सराटी उपकेंद्रातील आरोग्य सेविका एस. एच. मायंदे, आरोग्य सेवक इब्राहिम मकानदार, स्वाती खरात, पूजा जगदाळे, रेश्मा सय्यद, सुनीता जगदाळे, बशिरा शेख यांनी सराटीत घरोघरी भेटी देऊन फ्रिज, कुलर, पाणी साठवणूक टाक्या, टायर, नारळाच्या कवट्या, साठवणुकीतील भंगार याची पाहणी करून त्यातील पाणी रिकामे केले. डेंग्यू व चिकनगुनियाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमुळे होतो. डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा सर्व पाण्याची भांडी घासून स्वच्छ कोरडी करून उन्हात वाळवून नंतरच भरावीत व झाकून ठेवावीत, तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे गरजेचे आहे, असा सल्ला यावेळी देण्यात आला.

NPR22B02583

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01271 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top