नरहरी सोनार महाराजांची पालखी मार्गस्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरहरी सोनार महाराजांची पालखी मार्गस्थ
नरहरी सोनार महाराजांची पालखी मार्गस्थ

नरहरी सोनार महाराजांची पालखी मार्गस्थ

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ३ : संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पायी दिंडी पालखी सोहळा नरसिंहपूर येथील मुक्काम आटोपून दुपारच्या विसाव्यासाठी पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे दाखल झाला. यावेळी वारकऱ्यांचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत करून अन्नदान केले. त्यानंतर पालखी अकलूज मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.

नेवासे (जि. नगर) येथील संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांची पायी दिंडी नीरा नरसिंहपूर येथे काल सायंकाळी दाखल झाली होती. यावेळी सरपंच अश्विनी चंद्रकांत सरवदे, उपसरपंच मोहिते, विठ्ठल देशमुख, आनंद काकडे, मगनदास क्षीरसागर, राजेंद्र बळवंतराव, दत्तात्रेय कोळी महाराज, सोमनाथ काळे ग्रामसेवक गणेश लंबाते यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. हनुमंत कोळी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
आज सकाळी पालखी सोहळा बावडा नरसिंहपूर रस्त्याने येताना आडोबा व टणू ग्रामस्थातर्फे शीतल मोहिते, संदीप मोहिते, सचिन मोहिते, रणधीर मोहिते, बाळासाहेब जाधव, कोळी पाव्हणं आदी ग्रामस्थांनी स्वागत केले. पिंपरी येथे दुपाराच्या विसाव्याप्रसंगी वारकऱ्यांना लोकनेते कै. महादेवराव बोडके दादा यांच्या स्मरणार्थ दुपारचे अन्नदान करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या अध्यक्षा सुभद्रा बोडके, रोहयोचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बोडके, सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, समाधान बोडके, संतोष सुतार यांच्यासह ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली. ग्रामसेवक गणेश लंबाते, सुदर्शन बोडके, रमेश मगर, शहाजी बोडके, मल्हारी कोळी, ताजुद्दीन शेख, तेजस बोडके, पोपट बोडके, केशव बोडके, जयवर्धन बोडके, बाळू आत्तार आदींनी वाडपीचे संयोजन केले.
संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांची पायी दिंडीचे प्रस्थान गोंदी, लुमेवाडी मार्गे अकलूजच्या दिशेने झाले. अकलूज येथे बाळासाहेब दहिवाळ यांच्याकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली.

02589

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01273 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..