
पिंपरी बुद्रुक परिसरातील नळपाणी पुरवठा योजनेस दीड कोटी
नीरा नरसिंहपूर, ता. १ ः पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार व माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नातून सदर योजना मंजूर झाली आहे.
योजनेला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन स्तरावरील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्याने प्रशासकीय मान्यतेचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता योजनेच्या किमतीच्या १० टक्के /५ टक्के रक्कम लोकवर्गणीच्या स्वरूपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्यक राहील. सदर योजनेतून प्रत्येक घरास नळजोडणी देणे आवश्यक आहे. तसेच स्वखर्चाने १०० टक्के घरगुती नळजोडण्या व जलमापक बसविणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतीने किमान ८० टक्के नळजोडणी धारकाकडून स्व:खर्चाने मिटर जोडणी घेण्याबाबत हमीपत्र घेण्यात यावे.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून सदर योजना मंजूर करण्यात आली असल्याचे माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01292 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..