सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेत बोडके महाविद्यालयातील विद्यार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेत 
बोडके महाविद्यालयातील विद्यार्थी
सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेत बोडके महाविद्यालयातील विद्यार्थी

सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेत बोडके महाविद्यालयातील विद्यार्थी

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ९ ः सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धेत पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके (दादा) महाविद्यालयातील ६५ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील लोकनेते महादेवराव बोडके (दादा) विद्यालयाच्या पाचवी ते दहावीमधील जवळपास ६५ विद्यार्थ्यांनी सकाळ सुपर फॅमिली प्रश्नमंजूषा स्पर्धा २०२२ मध्ये सहभाग दर्शवला आहे. सदर योजनेची माहिती मुख्य वितरण व्यवस्थापक योगेश निगडे व बारामती विभागाचे व्यवस्थापक मनोज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शौकत तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना दिली. यामध्ये एक कोटीहून अधिकची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना हमखास स्कूल बॅग भेट देण्यात येणार आहे. यासाठी माजी सरपंच श्रीकांत बोडके, समाधान बोडके, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप पाडूळे, पर्यवेक्षक भारत कोरटकर, आबासाहेब बोडके, राजेंद्र पडळकर, नागनाथ लोंढे आदींनी मदत व सहकार्य केले. दैनिक सकाळ माध्यम समूहाच्या प्रत्येक स्पर्धा व योजनेत विद्यालय सहभागी होत असते.
2651

Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01296 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..