इंदापूर व बारामती नावाला वेगळे तालुके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर व बारामती नावाला वेगळे तालुके
इंदापूर व बारामती नावाला वेगळे तालुके

इंदापूर व बारामती नावाला वेगळे तालुके

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ३ : ‘‘इंदापूर व बारामती हे तालुके नावालाच वेगळे आहेत. परंतु, दोघांचे मागील पन्नास वर्षे घरातील नाते एकच आहेत. त्यामुळे येथील शालेय मुलींनी घरातील नात्याप्रमाणे आम्हाला सायकली तर दिल्या, परंतु त्याला जायला रस्ता द्या, असे हक्काने सांगितले. यापूर्वी सायकली दिल्या, तर आम्ही आता रस्ताच मंजूर करून द्यायला आलो आहोत,’’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
गिरवी (ता. इंदापूर) येथील गोंदी-ओझरे-गिरवी-ठोकळेवस्ती रस्त्याच्या १२ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, प्रशांत पाटील, सचिन सपकाळ, छायाताई पडसाळकर, दीपक जाधव, सागर मिसाळ, संग्रामसिंह पाटील, नागेश गायकवाड, पांडुरंग डिसले, दादासाहेब क्षीरसागर, नामदेव क्षीरसागर, अरुण क्षीरसागर, नवनाथ रूपनवर आदी उपस्थित होते. राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक; तर नंदकुमार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले.
‘‘खासदार सुप्रियाताई व आमदार भरणेमामांनी आमच्या मागणीला न्याय देत, सायकलींबरोबरच रस्ताही दिला, आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत,’’ अशा शब्दांत गिरवी येथील प्रतिक्षा ठोकळे हिच्यासह शालेय मुलींनी आभार व्यक्त केले.