काझी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काझी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
काझी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

काझी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ३० ः पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बावडा दूरक्षेत्रचे सहाय्यक फौजदार अश्तकउल्ला काझी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सहाय्यक फौजदार अश्तकउल्ला काझी म्हणाले, ‘‘आमच्या घरातील पोलिस सेवेमध्ये कोणीही नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझी निवड झाली. मला पहिली नियुक्ती नारायणगाव पोलिस स्टेशनला मिळाली होती. तेव्हापासून आजतागायत जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन मी काम केले आहे. सदोतीस वर्षाच्या कालखंडात माझ्या हातून सर्वसामान्यांची मनोभावे सेवा घडली. यादरम्यान माझ्यावर एकही आरोप प्रत्यारोप झाले नाहीत ही माझी जमेची बाजू ठरली आहे.’’ सेवानिवृत्ती निमित्त होत असलेला सत्कार हे त्याचेच प्रतीक असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण भंडलकर व भागवत भंडलकर यांच्या हस्ते त्यांचा फेटा, श्रीफळ, हार देवून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक फौजदार के. बी. शिंदे, पोलिस नाईक सुनील कदम, पोलिस आरिफ सय्यद, पोलिस नाईक अमोल गायकवाड, होमगार्ड कांबळे, हनुमंत भोसले, तानाजी शेंडगे, बापूराव जाधव, भागवत भंडलकर, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण भंडलकर आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक अभिजित भंडलकर यांनी केले. तर आभार अप्पा भंडलकर यांनी मानले. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.