इंदापुरातील उसाचे एकही कांडे शिल्लक राहणार नाही : भरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरातील उसाचे एकही कांडे 
शिल्लक राहणार नाही : भरणे
इंदापुरातील उसाचे एकही कांडे शिल्लक राहणार नाही : भरणे

इंदापुरातील उसाचे एकही कांडे शिल्लक राहणार नाही : भरणे

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. १३ : इंदापूर तालुक्यातील उसाचे एक कांडेही शिल्लक राहणार नाही. त्यासाठी दौंड शुगर व बारामती ॲग्रोची यंत्रणा येथील उसासाठी उपलब्ध करण्यात आली असून, उसाचे राजकारण करणाऱ्यांना यातून चांगलाच धडा शिकवू असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.

गणेशवाडी (ता. इंदापूर) येथील जल जीवन मिशनअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर एक कोटी १८ लाखांच्या कामाचे भूमिपूजन आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रशांत पाटील, अभिजित तांबिले, दादासाहेब क्षीरसागर, विठ्ठल देशमुख, चंद्रकांत सरवदे, नवनाथ रूपनवर, संग्रामसिंह पाटील, नागनाथ गायकवाड, पांडुरंग डिसले, शब्बीर काझी, सुनील जगताप, पांडुदादा बोडके, विजय घोगरे, सचिन कोकाटे, संपत पवार, शीतल कांबळे, बागल गुरुजी, राहुल बागल, ग्रामसेवक अंबिका पावसे, सुरेखा कुंभार, बशीरा तांबोळी आदी उपस्थित होते. विजय गायकवाड, नागनाथ गायकवाड, सौरभ घोगरे, रणजित शिंदे यांनी स्वागत केले. सुरेश शिंदे यांनी प्रास्ताविक, दिलीप बागल यांनी सूत्रसंचालन केले तर दत्तात्रेय घोगरे यांनी आभार मानले.

पूर्वीच्या राजकारण्यांनी आमदार व मंत्रिपदाचा बडेजाव मिरवला. जनतेच्या कामापेक्षा बॉडीगार्ड, ताफा घेऊन मिरवण्यात धन्यता मानली. परंतु मी आमदार व मंत्रिपदाचा उपयोग सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसाठी वापर केला. जनतेला कामातून आपलेसे करत आमदार व मंत्री स्वस्त कसा असतो हे दाखवून दिले.