चैतन्य विद्यालयात विज्ञान मेळावा, रांगोळी प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चैतन्य विद्यालयात विज्ञान मेळावा, रांगोळी प्रदर्शन
चैतन्य विद्यालयात विज्ञान मेळावा, रांगोळी प्रदर्शन

चैतन्य विद्यालयात विज्ञान मेळावा, रांगोळी प्रदर्शन

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. ३१ ः चैतन्य विद्यालय व श्री. सु. गो. दंडवते कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान मेळावा व रांगोळी प्रदर्शन उत्साहात पार पडले. विज्ञान मेळावा व रांगोळी प्रदर्शन दालनांचे उद्‍घाटन प्रमुख अतिथी अंकुश रणखांबे महाराज, शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मगनदास क्षीरसागर, माजी प्राचार्य धनंजय दुनाखे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर जगताप यांनी केले. रामानुजन जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
विज्ञान प्रदर्शन, कलाप्रदर्शनामध्ये टाकाऊपासून टिकाऊ व स्वयंहस्तचित्रे या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून मुक्तहस्ताने रांगोळी तसेच गणित सुबोध परीक्षा माध्यमातून करून घेतले. हातांच्या बोटातून मनातील भाव, संकल्पना, आनंद, शक्ती, चैतन्य, स्पंदने, अव्यक्तभाव आदी रांगोळीच्या माध्यमातून व्यक्त करणे तसेच गणितीय रांगोळीच्या माध्यमातून भुमितीय सूत्रे, प्रमेय, मनोरंजनातून गणिते विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
विज्ञान शिक्षक, कलाशिक्षक, गणित शिक्षक यांनी हे प्रदर्शन भरवले होते. विद्यार्थ्यांना धनंजय दुनाखे यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शन, कलाप्रदर्शन, रांगोळी, गणितीय रांगोळी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी, शेवरे, संगम, टणू, आडोबा वस्ती, चव्हाण वस्ती, कुरण वस्ती, इंगळे वस्ती, वाफेगांव येथील शाळांतील विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली. तसेच सर्व पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक बोरदे, तोडकर, लावंड, गणित शिक्षक राऊत तसेच कलाशिक्षक रानमाळ, निकते, बडवे, पवळ व प्रयोगशाळा असिस्टंट खारतोडे यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य गोरख लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
3015