इंदापूर तालुक्यात गव्हाचे पीक जोमात

इंदापूर तालुक्यात गव्हाचे पीक जोमात

नीरा नरसिंहपूर, ता. २० : इंदापूर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, चालू वर्षी गव्हाचे पिकाला थंडी व पोषक वातावरणामुळे पीक जोमात आले आहे.
इंदापूर तालुका उसाचे आगार म्हणून प्रसिद्ध असला, तरी ज्वारी, गहु, हरभरा, केळी, डाळिंब आदी पिकामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नीरा व भीमा नद्यांच्या परिसरात पाण्यामुळे बऱ्यापैकी उसाचे पीक घेतले जाते. परंतु मागील वर्षी पावसाचा सर्वच पिकांना फटका बसला आहे. तर उसाच्या उपलब्धतेअभावी कारखाने लवकरच बंद करावे लागले होते. पावसाने यावर्षीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने विहीरी, बोअरला पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ऊस तुटून गेल्यामुळे रिकाम्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी गहु पिकाला पसंती दिली आहे. त्यामध्ये लोकवन, २१८९, महाबीज आदी जातीच्या बियांण्यांची पेरणी केली. तसेच, गव्हाला लागणारी थंडी व पोषक वातावरणामुळे त्याची वाढ चांगल्या प्रमाणात झाली. सध्याला शेतात गहु उभा असल्याने काढणीस सुरवात करण्यात येणार आहे.

ओझरे (ता. इंदापूर) : गव्हाची सोनेरी झालर पसरल्याचे दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com