
नीरा नरसिंह परिसरात शिवरायांना अभिवादन
नीरा नरसिंहपूर, ता.२० : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील गावात प्रतिमा पूजन, मिरवणूक, अन्नदान तसेच व्याख्यान विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी केली व शिवप्रतिमेला अभिवादन केले.
नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, विठ्ठल देशमुख, आनंद काकडे, संतोष मोरे, प्रशांत बदले पाटील, विलास ताटे, ग्रामसेवक गणेश लंबाते आदींनी छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन केले.
गिरवी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच दादासाहेब शिरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी पांडुरंग डिसले, मारुती क्षिरसागर, अनिल क्षीरसागर, पोपट कोरे, आनंद ठोकळे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.
टणू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच प्रतिनिधी शितल मोहिते, बाळासाहेब (प्रकाश) मोहिते, समीर मोहिते, राजेंद्र मोहिते, सुनील मोहिते, संदीप मोहिते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच ज्योती बोडके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच श्रीकांत बोडके, आबासाहेब बोडके, उपसरपंच पांडूदादा बोडके, अशोक बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, बबन बोडके, अण्णा बोडके, युवराज गायकवाड, रज्जाक शेख, कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
03147