रेकॉर्ड डान्स स्पर्धेत गौरी, अक्षय यांची बाजी

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत गौरी, अक्षय यांची बाजी

नीरा नरसिंहपूर, ता.२० : टणू (ता. इंदापूर) येथील जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती फेस्टिव्हल पार पडला. यामध्ये रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडल्या. यात शालेय तसेच खुला गटामध्ये गौरी कांबळे, अक्षय जगताप यांची प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

शालेय गटातील विजेते व कंसात बक्षीस देणाऱ्यांचे नाव : प्रथम क्रमांक : गौरी रमेश कांबळे - ७००१ रुपये (संतोष दिगंबर मोहिते, गणेश कृषी केंद्र), व्दितीय क्रमांक :- आसावरी विनोद देवकुळे- ५००१ रुपये (अशोक दत्तात्रेय बळते), तृतीय क्रमांक :- रिक्तम समंथा ४००१ रुपये (नितीन जयसिंग मोहिते).
खुला गटात : प्रथम क्रमांक : अक्षय जगताप- ७००१ रुपये (राजेंद्र भिकाजी मोहिते, संचालक), व्दितीय क्रमांक :- कार्तिकी ताकतोडे- ५००१ रुपये (संतोष तुकाराम मोहिते), तृतीय क्रमांक :- उमेश शिंदे- ४००१ रुपये (अमृत सुभाष मोहिते पाटील) तर सात जणांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.

दोन्ही गटातील कलाकरासाठी विशेष बक्षीसे सचिन भारत जगताप १००० रुपये, देविदास बाळकू बोडरे १००० रुपये, किशोर बाळासाहेब जगदाळे १००० रुपये, भरत रामलिंग बळते १००० रुपये, किरण अंकुश मोहिते १००० रुपये, पांडुरंग दत्तात्रेय मोहिते १००० रुपये, जगजीवन श्रीकांत मोहिते १००० रुपये तर परीक्षक म्हणून प्रकाश कांबळे, अविनाश शिंदे, भरत साठे, सोमनाथ मोहिते यांनी काम पाहिले.
यावेळी मांजरी (पुणे) येथील शहीद जवान सौरभ फराटे यांच्या वीरपत्नी सोनाली फराटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी किल्ला अकलूज येथून ज्योत आणून ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच राम महाराज अभंग वडापुरी यांचे कीर्तन झाले. तसेच राजेंद्र मोहिते सर, सोमनाथ मोहिते, गणेश मोहिते, अभिजित मोहिते, विनोद मोहिते, बंटी मोहिते आदींनी स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन श्रीकांत मोहिते तसेच राजेंद्र मोहिते यांनी केले.

03149

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com