लुमेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लुमेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
लुमेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

लुमेवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. २३ : लुमेवाडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा व आरोग्य उपकेंद्र सराटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व समुपदेशन, रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे आदी तपासण्या करण्यात आल्या. लुमेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात हे मोफत तपासणी शिबिर पार पडले.
यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ताटे, डॉ. ज्ञानेश्वर भाहिगावकर, सहदेव मोहीते, वरीष्ठ क्षयरोग परिवेक्षक रणजीत खेडकर, वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा परीवेक्षक सागर शिंदे, क्ष-किरण तंत्रज्ज्ञ सुनिता पांढरे, आरोग्य सहायिका चिंतामणी गायकवाड आदींनी ग्रामस्थांच्या तपासण्या केल्या. त्यांना आशासेविका रेशमा सय्यद, बशीरा शेख, जगदाळे यांनी मदत केली. यामध्ये १५० महिला, १०० पुरुष, ७५ वयोवृद्ध, १० लहान बालके यांची तपासणी केली. तर २२५ जणांचे एक्स-रे काढण्यात आले. तसेच अनेकांना औषध-गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
शिबिरासाठी समुदाय अधिकारी शुभांगी चाळक, आरोग्य सेवक इब्राहिम मकबुलशा मकानदार, स्वाती खरात, पुजा जगदाळे, रेश्मा सय्यद, सुनिता जगदाळे, बशीरा शेख आदिंनी परीश्रम घेतले. तर, सरपंच पोपट जगताप, उपसरपंच कोकाटे, कमाल जमादार, सुनिल जगताप आदींचे सहकार्य लाभले.