पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सव उत्साहात
पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

पिंपरी बुद्रुक येथे शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. २३ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी बुद्रूक येथे राजमुद्रा प्रतिष्ठान, क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवसीय शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. हा महोत्सव महादेवराव बोडके विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली. तसेच तेजस बोडके यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित स्नेहभोजनाचा लाभ उपस्थितांनी घेतला.
महोत्सवात चैतन्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल नरसिंहपूर, माध्यमिक विद्यालय गिरवी, लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडलकरवस्ती व पिंपरी बुद्रूक येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचा आविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांनी त्यांच्या कलेला दाद देत सर्वच कलाकारांसाठी ७८ हजार रुपयांची बक्षीसे दिली.कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या पत्रकार शौकत तांबोळी, बाळासाहेब सुतार, मोहंमद कैफ तांबोळी, टिंकू ढवळसकर, अक्षय शिंदे, कालिदास आव्हाड, श्रृष्टी पवार आदींचा राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.