व्यवसाय सुरू करून महिलांनी मालक बनावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवसाय सुरू करून महिलांनी मालक बनावे
व्यवसाय सुरू करून महिलांनी मालक बनावे

व्यवसाय सुरू करून महिलांनी मालक बनावे

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता.२७ : ''''महिलांना कमी भांडवलामध्ये सुरु करता येतील असे अनेक उद्योग आहेत. बाजारपेठेची गरज ओळखून छोटे व्यवसाय सुरू करून मालक बनावे. व्यवसाय उभारणीला जिल्हा उद्योग केंद्र अनुदान देत असल्याने महिलांनी लाभ घ्यावा,'''' असे आवाहन उद्योग निरीक्षक यशवंत गायकवाड यांनी केले.
बावडा (ता. इंदापूर) येथे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मोफत कृषी पूरक उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी यशवंत गायकवाड बोलत होते. यावेळी प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके, कार्यक्रम समन्वयक रामदास पवार, आशिष नायकवाडी, कविता घोगरे सह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उद्योग निरीक्षक यशवंत गायकवाड पुढे म्हणाले, महिलांना जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना व बीज भांडवल योजनेत सहभागी होऊन नवं उद्योजक बनावे. योजने अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी ग्रामीण भागासाठी पस्तीस टक्के व शहरी भागासाठी पंचवीस टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

कार्यक्रम समन्वयक रामदास पवार म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बावडा येथे मोफत कृषी पूरक उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दरम्यान, लाभार्थी महिलांना एक हजार रुपये मानधन व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रम समन्वयक रामदास पवार यांनी दिली.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.. डी. रेंदाळकर, एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुरु आहे. यावेळी उद्योग निरीक्षक यशवंत गायकवाड, प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके, कार्यक्रम समन्वयक रामदास पवार, आशिष नायकवाडी, कविता घोगरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.


03175