
आतार यांना नॅशनल वूमन्स एक्सलन्स ॲवॉर्ड जाहीर
नीरा नरसिंहपूर, ता.१: सराटी (ता. इंदापूर) येथील तसेच सोलापूर डिव्हीजन रेल्वे हॉस्पिटल कुर्डुवाडी येथे मुख्य नर्सिंग अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या नसरीन शकील आतार यांना महिला दिनानिमित्त दिल्ली येथील नॅशनल वूमन्स एक्सलन्स अॅवॉर्ड पुरस्कार जाहीर झाला आहे.
आत्तार यांना दिल्ली येथे १२ मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भावमिक, खासदार नवनीत राणा आदींच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी १९९५ पासून रेल्वेच्या आरोग्य विभागात काम कामाचा ठसा उमटवला आहे. यापूर्वी देखील आतार यांना २००४-०५ साली डी. आर. एम. सोलापूर विभाग यांचेकडून उत्कृष्ट कार्यकुशलते चापुरस्कार देण्यात आलेला होता. चूल आणि मुल सांभाळून देखील सातत्याने आपल्या कर्तव्याच्या प्रती एकनिष्ठतेने काम करणाऱ्या नसरीन आत्तार यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रेल्वे हॉस्पिटलमध्ये सेवा करत असताना सी.एम.एस. सोलापूर डॉ. रामकृष्ण माने व डी.एम.ओ. कुर्डुवाडी डॉ. स्वेथा मिसाला यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समता फाउंडेशनचे शौकतभाई शेख, अॅड. मोहसिन शौकत शेख आदींनी अभिनंदन केले आहे. तसेच रेल्वे, आरोग्य, सामाजिक अशा विविध क्षेत्रातून सर्वत्रच त्यांचे अभिनंदन होत आहे.
03181