नीरा नरसिंहपूर परिसरात पिकांसह विटांचेही नुकसान

नीरा नरसिंहपूर परिसरात पिकांसह विटांचेही नुकसान

नीरा नरसिंहपूर, ता.१६ : येथील (ता. इंदापूर) परिसरातील गावात अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाट व गडगडाटात हजेरी लावली. त्यामुळे गहू, बाजरी, आंबा, डाळिंब, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला आहे. तसेच तयार विटांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला असून मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे‌. वादळी वारे, विजांचा कडकडाट व लखलकाट मोठ्या प्रमाणात होत आहे. तर काढणीला व हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, बाजरी पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होण्याची असं का शेतकरी राजाने व्यक्त केली आहे त्यामुळे काही गडबडीत का असेना गहू बाजरी काढणीची लगबग सध्याला सुरू झाली आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्यावा लागत असल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.


विटा फुटून नष्ट होण्याची शक्यता
उन्हाळा सुरू असल्यामुळे वीट भट्टी वरील विटा थापण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्या वाळायला ठेवल्या आहेत. परंतु अवकाळी पावसामुळे भिजण्याच्या भीतीने त्यांना झाकण्यासाठी मोठा प्लास्टिक कागद खरेदी करण्याची वेळ वीट भट्टी मालकावर आली. परंतु जर पाऊस मोठा झाला तर विटा फुटून नष्ट होण्याची शक्यता नाकारता करता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com