विद्यानिकेतन कॉलेजचे क्रिकेट स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यानिकेतन कॉलेजचे क्रिकेट स्पर्धेत यश
विद्यानिकेतन कॉलेजचे क्रिकेट स्पर्धेत यश

विद्यानिकेतन कॉलेजचे क्रिकेट स्पर्धेत यश

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर,या. २८ : राज्यस्तरीय फार्मा क्रिकेट कपमध्ये लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीने चतुर्थ क्रमांक मिळवला. शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये येथे पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३२ संघ सहभागी झाले होते.
विजेत्या विद्यानिकेतनच्या संघास पाच हजार ५५५ रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. स्पर्धेत शिवतेज दडस व स्मितेश पाटील यांना वेगवेगळ्या सामन्यांत सामनावीर म्हणून गौरवण्यात आले तर शिवतेज दडस यास स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटसमन म्हणून त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य सम्राट खेडकर, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, वैभव भागवत, स्वप्नील नाझरकर, ओंकार डोके, अमोल बन विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

03233