नीरा नरसिंहपूर येथे शिवसेना शाखेचे उद्‍घाटन

नीरा नरसिंहपूर येथे शिवसेना शाखेचे उद्‍घाटन

नीरा नरसिंहपूर, ता. १७ : ‘‘श्री लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीतून बाळासाहेबांच्या शिवसेनेची नव्याने सुरुवात करून प्रस्थापितांना हटवून सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देवून उभा करण्याचे काम यापुढे करण्यात येईल,’’ असे माजी राज्यमंत्री व शिवसेना नेत विजय शिवतारे यांनी केले.
नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे बाळासाहेबांची शिवसेना शाखेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, युवासेना तालुकाप्रमुख अण्णा काळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख ॲड. गीतांजली ढोणे, महिला जिल्हाप्रमुख सीमाताई कल्याणकर, भाऊसाहेब आंदळकर आदी यावेळी उपस्थित होते.
महारुद्र पाटील म्हणाले, ‘‘इंदापूरची जनता प्रस्थापितांना वैतागलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुरंदर तालुक्यापेक्षा जादाचे मताधिक्य इंदापूर तालुक्यातून देऊ. शिवतारे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला निधीची कमतरता भासणार नाही.’’
रूपचंद जाधव, संतोष मोरे, सागर इंगळे, विजय सरवदे, नितीन सरवदे, गौरव जगदाळे, नानासाहेब काळे, सोनू मोरे, इरफान शेख, लखन जाधव, सचिव क्षीरसागर, सचिन कदम, धनंजय पवार, गणेश जगदाळे, राहुल माने आदी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com