
आमदार भरणे यांचे नृसिंह चरणी साकडे
नीरा नरसिंहपूर, ता. ४ : ‘‘बळीराजावरील संकटे दूर होऊ दे, पाऊस पाणी चांगले पडू दे, शेतशिवार फुलून शेतमालाला चांगला भाव मिळून जीवनात सुख समृद्धी लाभू दे,’’ असे साकडे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी घातले.
श्री नृसिंह नवरात्रोत्सवानिमित्त भरणे यांनी गुरुवारी (ता. ४) तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान मंदिरात येऊन अभिषेक घालून प्रार्थना केली. श्रीकांत दंडवते, चंद्रकांत सरवदे, श्रीकांत बोडके, नरहरी काळे, विठ्ठल देशमुख, सतीश काकडे, अरुण क्षिरसागर, दशरथ राऊत, दत्तात्रेय कोळी, शीतल कांबळे, शंकर राऊत, संतोष क्षिरसागर, सचिन मोहिते, गणेश लंबाते आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी देवस्थानच्या वतीने भरणे यांचा सन्मान सागर काकडे यांनी केला. यावेळी सुर्यनारायण दंडवते, गौरव दंडवते, प्रसाद दंडवते, श्रीराम डिंगरे, नंदू देवळे आदी पुजारी मंडळी उपस्थित होती.