भीमा नदीवरील बंधारे तुडूंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमा नदीवरील बंधारे तुडूंब
भीमा नदीवरील बंधारे तुडूंब

भीमा नदीवरील बंधारे तुडूंब

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता.१९: ऐन उन्हाळ्यात नीरा नदी कोरडी तर भीमा नदीवरील बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर काही दिवस तरी पिकांना जीवदान मिळणार आहे. तर जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सोय झाली असल्याचे शेतकरी तसेच महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
भीमा नदीवरील नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधाऱ्यात उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी सोडलेल्या पाण्यातून काही पाणी अडवून बंधारे तुडूंब भरून घेतले आहेत. त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रूक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांना पावसाळ्याच्या तोंडावर काही दिवसासाठी जीवदान मिळणार आहे. तर नीरा नदीवरील संगम, गणेशगाव, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी आदी बंधारे सध्याला पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. त्यामुळे नदी काठावरील पिण्याच्या पाणी योजना बंद झाल्या आहेत. तसेच जनावरांच्या चारा व पाण्याची मोठी तारांबळ उडाली असल्याची शेतकरी, नागरिक व महिलांनी सांगितले. तसेच नीरा नदीकाठावरील इंदापूर तालुक्यातील सराटी, लुमेवाडी, गोंदी, गिरवी, नरसिंहपूर, निरनिमगाव, चाकाटी तसेच माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, बिजवडी, सवतगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज आदि गावातील हजारो एकरावरील उभ्या असणाऱ्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका सहन करण्याची वेळ आली आहे.

नीरा व भीमा परिसराला बागायती पट्ट्याचे स्वरूप
भीमा नदीच्या पाण्याच्या वितरणामुळे विहिरी, बोअर, तलावाच्या पाण्यात वाढ झाली आहे तर नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधारा ऐन उन्हाळ्यात पाण्याने तुडूंब भरले आहेत. त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांना जीवदान मिळणार आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा व भीमा नद्यांच्या परिसराला पाण्यामुळे बागायती पट्ट्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
भीमा नदी पाण्याने तुडुंब भरली असली तरी उष्णता व विजेअभावी पाणीच देता येत नाही. विद्युत मोटारी बंद असल्याने केबल, स्टार्टर व मोटारी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला असल्याने शासन नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

03357, 03356