स्वस्तात घराच्या आमिषाने साडेतेरा लाखांची फसवणूक

स्वस्तात घराच्या आमिषाने 
साडेतेरा लाखांची फसवणूक
Published on

ओतूर, ता. २० : उदापूर (ता. जुन्नर) येथील एकाची ‘एमएमआरडीए’मध्ये (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने साडेतेरा लाखांची फसवणूक केली आहे.
याबाबत ओतूर पोलिसात नीता अंकुश सराईकर (सध्या रा. रूम नं. बी २२, पहिला मजला, न्यू वसंत व्हिला, अमृतनगर सर्कल, घाटकोपर, पूर्व मुंबई; मूळ रा. सिंधुतारा अपार्टमेंट, रूम नं २०३, दुसरा मजला, हॉटेल प्लॅटिनमच्या पाठीमागे, जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सागर मंडलिक (रा. उदापूर) यांनी ओतूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीता सराईकर आणि त्यांची फेसबुकवरून सन २०२४ मध्ये ओळख झाली. तसेच, त्या जुन्नर तालुक्यातील असून, त्यांचे उदापूर येथे नातेवाईक आहेत, हे चॅटिंगमध्ये समजले. नीता यांनी आपण एमएमआरडीएमध्ये अधिकारी असल्याचे भासवून तिने झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत मंडलिक यांना फक्त ८ लाखांत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून मंडलिक यांनी वेळोवेळी आरटीजीएस व फोन पेद्वारे एकूण १३ लाख ५७ हजार २०० रुपये सराईकर हिच्या खात्यावर पाठवले. मात्र, घराचा ताबा काही त्यांना मिळाला नाही. त्यानंतर आरोपीने पैसे परत करते म्हणून दिलेला धनादेशही बाउन्स झाला. याबाबत मंडलिक यांनी ओतूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.तसेच संबंधित महिलेवर अशाच प्रकारे फसवणुकीची मुंबईमधील पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल असल्याची माहिती सागर मंडलिक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com