ओतूर येथील डॉ. पोळ यांना हिंद रत्न पुरस्कार

ओतूर येथील डॉ. पोळ यांना हिंद रत्न पुरस्कार

Published on

ओतूर, ता. १ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील पानसरेवाडीचे मुळ रहिवासी व सध्या अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत डॉ. विलास पोळ यांना हिंद रत्न पुरस्कार देऊन एनआरआय सोसायटीतर्फे गौरविण्यात आले. ऑक्सफर्ड टाउन हॉल, इंग्लंड येथे गुरुवारी (ता. ३०) हे वितरण झाले.
पर्ड्यू विद्यापीठातील डेव्हिडसन स्कूल ऑफ केमिकल इंजिनिअरिंगच्या विलास पोळ एनर्जी रिसर्च (व्हायपर) गटाला लिथियम-आयन बॅटरी चार्ज करण्यासाठी सर्वात कमी तापमानामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचा किताब मिळाला. त्यासंदर्भात डॉ. पोळ यांना हे पुरस्कार देण्यात आले. हे संशोधन महत्त्वाचे आहे कारण यामुळे संशोधकांना चंद्र आणि अंतराळ मोहिमा, उच्च-उंचीवरील हवाई वाहने आणि पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या अत्यंत थंड तापमानाच्या वातावरणाचे अनुकरण करण्यास मदत मिळते. व्हायपर गटामध्ये पदवीपूर्व, पदवीधर विद्यार्थी आणि पोस्टडॉक्टरल संशोधकांचा समावेश आहे.
ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रातील विविध शोधांसाठी डॉ. पोळ यांना ४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या संशोधन पथकाने ३०० आंतरराष्ट्रीय लेख प्रकाशित केले आहेत आणि या शोधांसाठी २७ अमेरिकन पेटंटही मिळवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com