डॉ. संजीव कुमार यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Professor Sanjeev Kumar
शिरोली विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरवे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

डॉ. संजीव कुमार यांचा गौरव

sakal_logo
By

दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. संजीव कुमार यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. पुण्यात आयोजित कार्यक्रमात पद्मश्री विजयकुमार शाह यांच्या हस्ते डॉ. संजीव कुमार यांना भारतीय साहित्य रत्न किताबाने सन्मानित करण्यात आले.

संजीव कुमार यांनी पॅरिस येथील ईस्ट ब्रिज कॉलेजमधून डॉक्टरेट पूर्ण केले आहे. संजीवकुमार यांना एप्रिल महिन्यात डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते मुंबईत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दिल्ली विद्यापीठाचं नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी काम करत राहू, असा निर्धार त्यांनी केलाय.

शिरोली विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरवे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

ओझर, ता. ५ : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक टी. सी. थोरवे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यालयाला ५१ हजार रुपये व मुक्ताई मंदिर जीर्णोद्धारासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नरचे नायब तहसीलदार सचिन मुंढे, विष्णू थोरवे, अॅड. अविनाश थोरवे, उपसरपंच वैशाली थोरवे, माजी सरपंच लक्ष्मण शेरकर, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वागदरे सर, मुख्याध्यापक संघाचे सचिव काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक थोरवे यांना मानपत्र, पोशाख, शाल, बुके, सरस्वतीची प्रतिमा देऊन सपत्नीक सन्मानित केले. शोभा गायकवाड यांनी प्रास्ताविक; तर श्री निधन यांनी सूत्रसंचालन केले. पी. जी. गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Oza22b00418 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top