
कांदा बराकीत खत टाकल्याने शिरोलीच्या शेतकऱ्याचे नुकसान
ओझर, ता. ११ : शिरोली बुद्रुक (ता.जुन्नर) येथील सुरेश बोऱ्हाडे या शेतकऱ्याने कांद्याची साठवण केलेल्या बराकीत अज्ञाताने युरिया खत टाकले. यामुळे कांदा सडून खराब झाला. मुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बोऱ्हाडे यांनी एक महिन्यापूर्वी कांद्याची साठवण केली होती.
कांदा चाळीतून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे पाहणी केली असता कांद्यावर युरिया टाकल्याचे निदर्शनास आले. उन्हाळ्याच्या दिवसात सहसा कांदा खराब होत नाही. मागील वर्षी देखील याच शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञाताने रासायनिक खत टाकल्याने मोठे नुकसान झाले होते.
साधारणपणे एक एकर कांदा उत्पादनासाठी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये इतका खर्च येतो. सलग दोन वर्ष अशा प्रकारे नुकसान झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाला आहे. अज्ञाताने सूड उगवण्याच्या भावनेतून केलेल्या या कृत्याचा समाजात निषेध केला जात आहे. दरम्यान, युरिया खत टाकण्याच्या प्रकारास कंटाळून संबंधित शेतकऱ्याने कांदाचाळी भोवती काटेरी तारेचे कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) : अज्ञात व्यक्तीने रासायनिक खत टाकल्याने कांदाचाळीत सडलेला कांदा.
Web Title: Todays Latest District Marathi News Oza22b00421 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..