ओझरला गणेश जन्मोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओझरला गणेश जन्मोत्सव उत्साहात
ओझरला गणेश जन्मोत्सव उत्साहात

ओझरला गणेश जन्मोत्सव उत्साहात

sakal_logo
By

ओझर, ता. ३१ : भाद्रपद शुद्ध चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी गणरायाचे मंदिर परिसर गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेले होते, अशी माहिती श्री विघ्नहर गणपती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.
सकाळी दहा वाजता चवथ्या द्वारयात्रेसाठी टाळ मृदुंगाचा गजरात भजनांच्या मंगल सुरात श्रींच्या पालखीचे ओझर येथील जगदाळे मळा आंबेराईकडे प्रस्थान झाले. त्याठिकाणी अंबिका माता मंदिरात पृथ्वी सूर्य पूजा करून श्रींच्या पालखीचे बारा वाजता मंदिरात आगमन झाले. दरम्यानच्या काळात हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी यांनी गणेश जन्माचे कीर्तन सादर केले. ग्रामस्थ, देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी, विघ्नराजेंद्र जोशी, जयेश जोशी, अमय मुंगळे यांनी मोरया गोसावी पदांचे गायन केले. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी जन्मोत्सव सोहळ्यासाठी चोख व्यवस्था केली होती. यावेळी आलेल्या गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडला.
ओझर नगरीत दोन दिवस यात्रोत्सव साजरा होणार असून देश विदेशातील पर्यटक तसेच श्रींचे भक्तगण यामध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले आहे. जुन्नरचे उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक परशुराम कांबळे व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Oza22b00438 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..