ओझरला सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओझरला सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात
ओझरला सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात

ओझरला सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

ओझर, ता. ३ : ओझर परिसरात सोयाबिन काढणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. उन्हात वाळवलेल्या सोयाबीनची साठवण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने काढणी योग्य झालेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर उन्हाचा कडाका वाढल्याने वाळलेल्या पिकाच्या शेंगा फुटून सोयाबीनच्या दाण्यांची गळ होऊ लागल्याने साडेचार ते साडेपाच हजार रुपये प्रति एकर दराने शेतकऱ्यांनी मिळले त्या शेतमजूरांकडून सोयाबीन काढणी करून घेतली.
पाऊस उघडल्यावर पुन्हा पावसाला सुरुवात होईल, या भितीपोटी अनेक शेतकऱ्यांनी पाणी साठलेल्या जमिनीतून सोयाबीन काढून सुरक्षीत ठिकाणी हलविले होते. त्यानंतर साडेतीनशे ते चारशे रुपये क्विंटल दराने पैसे देऊन मळणी यंत्राने तयार करून घेतलेल्या सोयाबिनची आता ताडपत्री कागदांवर वाळवण करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति किलोला पन्नास रुपये बाजारभाव मिळत असून गरजू शेतकरी तयार माल लगेचच विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. मागील वर्षीच्या हंगामात काही कालावधीसाठी सोयाबिनला प्रति किलोसाठी पंच्याहत्तर रुपये दर मिळाला होता. यंदाही बाजारभाव वाढतील या आशेमुळे बहुतांशी शेतकरी सोयाबीनची साठवण करत आहेत.

00838