ओझरच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओझरच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव
ओझरच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव

ओझरच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः जुन्नर तालुक्यातील ओझरच्या सरपंच मथुरा राजेंद्र कवडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ३५ नुसार बुधवारी (ता. १६) रोजी दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालय ओझर येथे, ग्रामपंचायत सदस्यांसाठी विशेष सभा आयोजित केली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास दाखल करताना म्हटले आहे की, सरपंच मथुरा कवडे या ग्रामस्थांना चुकीची माहिती पुरवतात. ग्रामपंचायत सदस्यांना दैनंदिन कारभारात विश्वासात न घेता मनमानी करतात तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विविध कामांबद्दल चुकीची माहिती देतात. ओझर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विठ्ठल तुळशीराम जाधव, सदस्य अनिल गणपत मांडे, सुमन प्रकाश मांडे, संगीता ज्ञानेश्वर टेंभेकर, राजश्री तुकाराम कवडे, रवींद्र आंबादास मांडे या सदस्यांच्या सह्यांचे अविश्वास ठरावाचे पत्र तहसीलदारांना दिले होते.
या अविश्वास ठरावावर जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय होणार आहे. सोळा फेब्रुवारीला अविश्वास ठरावाबाबत काय निर्णय होणार, याकडे ओझर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.