शिरोलीत शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला

शिरोलीत शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला

ओझर, ता.१४ : शिरोली बुद्रुक (ता.जुन्नर) येथे कांदा काढणीचे काम करताना शेतकरी व शेत मजुरांवर गुरुवारी (ता.१४) मधमाशांनी हल्ला केला. आंब्याच्या झाडावरील हे आग्या मोहळाच्या मधमाशा होत्या. त्यांच्या हल्ल्यात शेतकरी पती पत्नी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

शेतात काम करणारे परप्रांतीय शेतमजूर व त्यांच्या लहान मुलांनाही काही प्रमाणात मधमाशांनी जोरदार डंक केला. शेतकरी अरुण शेरकर यांना पाचशेहून अधिक माशांनी डंक घेतला असून, त्यांच्या पत्नी पुष्पा शेरकर यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर मधमाशांनी हल्ला केला आहे. या दांपत्यावर नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात कडाक्याच्या उन्हामुळे मोहळा वरील मधमाशा अन्नपाण्याच्या शोधात वातावरणात फिरत असतात. अशावेळी आपण त्यांच्यापासून दूर जायला हवे, मोहळाला दगड मारणे, तेथे जोरात आवाज करणे किंवा त्या ठिकाणी धूर करणे या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. मधमाशांनी चावा घेतल्यावर तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे असते. तीव्रतेनुसार मधमाशांच्या विषाचा प्रभाव २४ तास ते आठ दिवसांपर्यंत राहू शकतो. त्यामध्ये उलट्या, जुलाब होणे, अंगावर सूज येणे, रक्तदाबामध्ये अनियमितता अशी लक्षणे दिसून येतात, असे डॉ. सदानंद राऊत यांनी सांगितले.

00933

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com