
कुरकुंडी येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
पाईट, ता. ६ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रदिनी ज्येष्ठ नागरिकांचा होणारा सन्मान हा त्यांच्या संघर्षाचा आणि अनुभवाचा सन्मान असल्याचे मत कीर्तनकार शंकर महाराज शेवाळे यांनी कुरकुंडी येथे व्यक्त केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी पाईट गटातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा व ज्येष्ठ नागरिक अनुभव लेखन स्पर्धा आयोजित केली होती. यातील निवडक लेखांचे ‘मावळतीचे रंग’ हे पुस्तक तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शरद बुट्टेपाटील, माजी उपसभापती अमोल पवार, प्रा. बजरंग कदम, दत्तात्रेय मांडेकर, रोहित डावरे, देवदास बांदल, रामदास कोळेकर, काळूराम राळे, महेंद्र पडवळ, अरुण भोकसे, गणेश चौधरी, रंजना भोकसे, मनीषा हाबडे, वैशाली तांबे, ज्ञानेश्वर शिवेकर ,भगवान देशमुख, किसन आवारी, बबन डांगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात १२५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला, तसेच ११ मंडळाला भजनी साहित्य वितरित करण्यात आले. संभाजी कड यांनी सूत्रसंचालन केले. काळूराम राळे यांनी आभार मानले.
PAT22B01263
Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00537 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..